बिबट्या – खलनायक की बिचारा?

आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त मानद वन्यजीवरक्षक प्रतीक मोरे यांचा लेख…

पुत्रभेटीचा महोत्सव काही घडला नाही; पण ‘त्याला’ मिळाले नवे घर

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या पुनस गावात महिन्याभरापूर्वी बिबट्याचे एक महिन्याचे पिल्लू आढळले. त्याची आईशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले; मात्र वनविभागाने त्याची उत्तम काळजी घेऊन त्याला घर मिळवून दिले. वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या बातम्या वारंवार कानी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही घटना नक्कीच सुखावणारी आहे.

कुरतडे येथे विहिरीत सापडलेल्या बिबट्याला जीवदान

रत्नागिरी : कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील कातळवाडी येथे आज सकाळी साडेसात वाजता विहिरीत बिबट्या सापडला. वन विभागाला कळविल्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

वेरवली बुद्रुक गावात कुत्र्याला बिबट्याने पळवले

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावात काल (१५ सप्टेंबर २०२०) रात्री सरदेसाई यांच्या घराच्या आवारात शिरून कुत्र्याला पळवून नेले. बिबट्यानेच कुत्र्याला पळवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झाले. गेल्याच महिन्यात वेरवली बुद्रुक गावात एक बिबट्या मरून पडला होता. काल पुन्हा दुसऱ्या बिबट्याने कुत्र्याला पळवून नेल्याने गावात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले असून भीतीचे वातावरण आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या बिबट्याच्या अधिवासाला अनुकूल वातावरण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पँथर) अधिवासाला वातावरण अनुकूल असून, संगमेश्वर तालुक्यात कोंडिवरे येथे सापडलेल्या काळ्या बिबट्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रत्नागिरीच्या परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड यांनी दिली. संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे १० जुलै रोजी ब्लॅक पँथरचे दर्शन घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाला. त्याबाबत श्रीमती लगड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला.