नाकावाटे ब्रेन ट्यूमर काढणारे न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान ठरतेय वरदान; रत्नागिरीत १७ मे रोजी विशेष शिबीर

ठाण्यातील सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत ब्रेन ट्यूमरच्या १००हून अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे मेंदू/कवटी न उघडता अचूकपणे शस्त्रक्रिया करता येत असल्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. मणक्याच्या विकारांवरही याद्वारे उपचार करता येतात. सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयीचे (न्यूरॉलॉजी अँड स्पाइन) मोफत वैद्यकीय शिबीर रविवारी, १७ मे २०२६ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.

रत्नागिरीचे तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांना न्यूरोसर्जरीतील सुवर्णपदक प्रदान

नवी दिल्लीच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’ (NBEMS) या संस्थेचा २१वा दीक्षान्त सोहळा २० जून २०२२ रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडला. त्या वेळी रत्नागिरीतील तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांना ‘डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड’ (Doctorate of National Board – DrNB) या परीक्षेत न्यूरोसर्जरी या विषयात सर्वोत्तम गुण मिळाल्याबद्दल सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले

रत्नागिरीचे तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांना सुवर्णपदक; शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा

मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या आणि शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाच्या शस्त्रक्रिया रत्नागिरीसारख्या ठिकाणी अत्यंत कुशलतेने आणि अल्प खर्चात पार पाडून अनेकांना नवं आयुष्य देणारे तरुण न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय अनिरुद्ध फडके यांच्या शिरपेचात आता मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.