संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.

श्री लक्ष्मीपल्लीनाथाची गाथा ई-बुक स्वरूपात मराठी आणि इंग्रजीत प्रकाशित

श्री लक्ष्मीपल्लीनाथ या देवतेचा इतिहास आणि अन्य महत्त्वपूर्ण संदर्भांची माहिती देणारी ‘गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची’ ही पुस्तिका ई-बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहे. संदीप नाटेकर यांनी केलेल्या त्या पुस्तिकेच्या इंग्रजी अनुवादाचेही ई-बुक प्रकाशित करण्यात आले आहे.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव आजपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव येत्या शुक्रवारपासून (दि. ३१ मार्च) सुरू होत आहे. यावर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा मिरज येथील ड़ॉ. भास्कर प्राणी आणि कुटुंबीय करणार आहेत.

मठ येथील लक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वा चैत्रोत्सव सोमवारपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वाज वार्षिक चैत्रोत्सव येत्या सोमवारी (दि. ११ एप्रिल) सुरू होणार आहे. रविवार, १७ एप्रिलपर्यंत चालणार असलेल्या या उत्सवात प्रख्यात कीर्तनकार हभप मकरंदबुवा रामदासी कीर्तनसेवा रुजू करणार आहेत.