मठ येथील लक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वा चैत्रोत्सव सोमवारपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वा वार्षिक चैत्रोत्सव येत्या सोमवारी (दि. ११ एप्रिल २०२२) सुरू होणार आहे. रविवार, १७ एप्रिलपर्यंत चालणार असलेल्या या उत्सवात षोडशोपचार पूजा, अभिषेक, लघुरुद्र आणि सेवा केल्या जाणार आहेत. प्रख्यात कीर्तनकार हभप मकरंदबुवा रामदासी कीर्तनसेवा रुजू करणार आहेत.

या वर्षीचा उत्सव वळके (ता. रत्नागिरी) येथील मुळ्ये परिवार यांच्या पुढाकाराने साजरा होणार आहे. सोमवारी, ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता राजोपचार पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. रात्री ८ वाजता स्वरयात्री (शोधगाथा संगीताची) हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये डोंबिवली येथील सौ. केतकी मुळ्ये-कुलकर्णी यांचे हार्मोनियम एकल वादन, तर रात्री ९ वाजता धनंजय म्हसकर यांचे एकल गायन होईल. त्यांना सुशील गद्रे (ऑर्गन) आणि अथर्व आठल्ये (तबला) संगीतसाथ करतील. निवेदन महेश आठल्ये करतील.

मंगळवार ते शुक्रवार, १५ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी मंत्रजागर, रात्री भोवत्या, छबिना असे कार्यक्रम होतील. दररोज रात्री साडेआठ वाजता मकरंदबुवा रामदासी यांचे कीर्तन होईल.

इतर कार्यक्रम असे – १५ एप्रिल – सायंकाळी ५ वाजता श्रीमहालक्ष्मी कुंकुमार्चन, हळदीकुंकू, १६ एप्रिल – रात्री ९.३० वाजता अंतरा पंडित (इंदूर) यांचे गायन, १७ एप्रिल – पहाटे ४ वाजता लळिताचे कीर्तन.

याशिवाय १२ एप्रिल गणेशयाग, १३ एप्रिल पवमान स्वाहाकार, १४ एप्रिल दत्तयाग, १५ एप्रिल नवचंडी आणि १६ एप्रिल रोजी सौरयाग असे कार्यक्रम होणार आहेत. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १६ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता होईल.

उत्सवकाळातील धार्मिक विधींसाठी दिवाकर गुण्ये (8830821987), शरद हळबे (9422013038) किंवा आदित्य करंबेळकर (8830659416) यांच्याशी संपर्क साधावा. देणगी आणि संस्थेशी संबंधित अन्य कारणांसाठी अध्यक्ष सुधाकर चांदोरकर (9422646765) किंवा उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये (7875993699) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पल्लिनाथभक्तांनी मोठ्या संख्येने मंदिरात उत्सवाला उपस्थित राहून, कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply