निसर्गरम्य तोणदे गाव (व्हिडिओ)

तोणदे (ता. जि. रत्नागिरी) हे कोकणातील एक निसर्गरम्य गाव. या गावातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडविणारा व्हिडिओ प्रहर विठ्ठला महाकाळ या रत्नागिरीतील तरुण कलाकाराने केला आहे.

आगरनरळच्या शिमगोत्सवाचा व्हिडिओ

रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक ‘शिमगोत्सव’ आजही गावागावांतून जपला जात आहे. आगरनरळ (ता. जि. रत्नागिरी) या गावातील शिमगोत्सवाबद्दलचा व्हिडिओ प्रहर विठ्ठला महाकाळ या तरुणाने चित्रित केला आहे. शिमगोत्सवातील पालखीनृत्य, खेळे नाचवणे आदी सर्व प्रकार या व्हिडिओत पाहायला मिळतात. त्याचा हा व्हिडिओ सोबत देत आहोत.

रत्नागिरीतील कलाकारांनी केलेले गणपतीचे नवे गाणे (व्हिडिओ)

कोकणातला महत्त्वाचा उत्सव असलेला गणेशोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने, रत्नागिरीतील कलाकारांनी गणपतीबाप्पाचे एक नवे गाणे तयार केले असून, त्याचा व्हिडिओ यू-ट्यूबवर शेअर केला आहे. गीत स्वानंद मयेकर यांचं असून, संगीत-संकलन प्रहर महाकाळ यांचं आहे.

डुगवे येथील लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात बासरीवादन – प्रहर महाकाळ (व्हिडिओ)

सहा सप्टेंबर रोजी यंदाचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्या निमित्ताने, रत्नागिरीतला युवा कलाकार प्रहर महाकाळ याने बासरीवादनाचा विशेष व्हिडिओ तयार केला आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावाजवळच्या डुगवे नावाच्या गावात एका पाषाणावर असलेल्या श्री लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात प्रहरने हे बासरीवादन केले आहे. हा व्हिडिओ सोबत देत आहोत.

ऐ मेरे वतन के लोगों – बासरीवादन – प्रहर महाकाळ

आज देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने, मूळचा रत्नागिरीकर असलेल्या प्रहर विठ्ठला महाकाळ या युवा कलाकाराने बासरीवर ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं वाजवलं आहे. व्हिडिओ सोबत देत आहोत.