पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये विवेक मोरे विजेता

रत्नागिरी : आज येथे झालेल्या पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक लांबीच्या २१ किलोमीटर स्पर्धेत विवेक मोरे विजेता ठरला. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि परदेशी नागरिकांनीही स्पर्धेत सहभाग घेऊन आगळेवेगळे रंग भरले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या हस्ते कोकण कोस्टल मॅरेथॉनचे उद्घाटन

रत्नागिरी : येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे उद्घाटन रत्नागिरीतील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या हस्ते होणार आहे.

रत्नागिरीतील कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये १५०० जण धावणार

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या ७ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनकरिता सुमारे १५०० जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या स्वागतासाठी ९ गावे सज्ज

रत्नागिरी : येत्या ७ जानेवारी रोजी रत्नागिरीत प्रथमच होणार असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमधील धावपटूंच्या स्वागतासाठी नऊ गावांमधील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

धावनगरी रत्नागिरीसाठी ७०० हून अधिक धावपटूंची नोंदणी

रत्नागिरी : येत्या ७ जानेवारी रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनसाठी आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूरसह परराज्यातीलही धावपटूंचाही समावेश आहे.

सुरुवात करा, सातत्य राखा आणि सफल व्हा : आशीष कासोदेकर

रत्नागिरी : फेसबुक, इन्स्टाग्राम, रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यात प्रेरणादायी गोष्टींची कमतरता नाही. कमतरता आहे ती सुरुवात करण्याची आणि सुरुवात झाल्यावर सातत्य राखण्याची. ते राखावे आणि यशस्वी व्हावे, असा कानमंत्र विश्वविक्रमी मॅरेथॉन रनर आशीष कासोदेकर यांनी रत्नागिरीकरांना दिला.