मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान कोकणातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी काही साहित्य, तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी दिली.