लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे.
