शेवग्याच्या पानांचे लाडू, अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय, रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी हे पदार्थ ठरले जिल्हास्तरीय रानभाज्या पाककला स्पर्धेत विजेते

जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवात घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी रानभाज्यांच्या अनेक कल्पक पाककृती सादर केल्या होत्या. पूजा सुरेश भुवड यांना रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी या पाककृतीसाठी पहिला क्रमांक मिळाला. अनन्या अक्षय खानविलकर यांनी केलेली अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय (प्युअर व्हेज) ही पाककृती दुसऱ्या क्रमांकासाठी निवडली गेली. शर्मिली विनय गांगण यांनी केलेले शेवग्याच्या पानांचे लाडू तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.

कोकण कृषी विद्यापीठात रानभाज्या पाककृती स्पर्धा; अपर्णा तलाठी प्रथम

दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागामार्फत नुकतीच रानभाज्यांच्या पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अपर्णा तलाठी यांनी बनविलेल्या ‘रानभाज्यांची खांडवी’ या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच, प्रिया बेलोसे यांनी बनविलेली ‘सुरणाची खीर’ दुसऱ्या क्रमांकाची, तर निशिगंधा कुडाळकर यांनी तयार केलेली ‘टाकळ्याची तंबळी’ तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.