पाऊस लवकर आला; पण पेरणीची घाई नको; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

यंदा रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अभूतपूर्व प्रमाणात पाऊस पडला आहे; मात्र शेतकऱ्यांनी भात आणि नाचणीच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. एरव्ही पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होते. त्यामुळे पेरणीचा हंगाम गेलेला नसून, यापुढे चार-पाच दिवस पाऊस थांबून ऊन पडल्यावर भातपेरणी करणे सोयीचे ठरेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पावसाच्या अविश्रांत हजेरीचा सप्ताह; जगबुडी आणि वाशिष्ठीच्या पाणीपातळीत होतेय वाढ

खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीच्या पाणीपातळीने काल (२६ मे) इशारा पातळी ओलांडली होती. आज (२७ मे) सकाळच्या अहवालानुसार पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी झाली आहे; मात्र सकाळपासून दुपारपर्यंतच्या कालावधीत जगबुडी आणि चिपळूणमधील वाशिष्ठी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

मुंबई, पुणे, सोलापूरसह राज्याच्या ३० टक्के भागात पोहोचला मान्सून

यंदा मान्सून अनेक विक्रम मोडीत काढत असून, काल (२५ मे) तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने आज एका दिवसात मुंबई, पुणे, सोलापूरसह महाराष्ट्राचा ३० टक्के भाग व्यापला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

… आणि मान्सूनने एका दिवसातच गाठला केरळमधून महाराष्ट्राचा पल्ला

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे; मात्र त्यामुळे तयार झालेल्या अनुकूल वातावरणामुळे मान्सून चक्क १३-१४ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज, २५ मे २०२५ रोजी मान्सून तळकोकणात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

नैर्ऋत्य मान्सून दक्षिण अंदमानात दाखल!

नैर्ऋत्य मोसमी पावसाने दक्षिण अंदमानचा समुद्र व्यापला असल्याची माहिती आज (१३ मे २०२५) भारतीय हवामान खात्याने जाहीर केली.