कुर्धे येथे पार पडले ‘अभाविप’चे परीस उन्हाळी शिबिर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शहर विभागातर्फे नुकतेच परीस उन्हाळी शिबिर पावसजवळील कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात पार पडले.

व्हॉट्स अॅप ग्रुप शब्दकोडेप्रेमींनी सोडविले विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजांचे कोडे

रत्नागिरी : शब्दकोड्याच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमुळे आभासी पद्धतीने एकत्र आलेल्या सदस्यांनी समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजांचे कोडे आर्थिक मदतीतून सोडविले आहे. कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील ए. के. मराठे यांनी चालविलेल्या या ग्रुपमुळे अनेक विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे.

अमावास्येला पेटवलेली ज्ञानज्योत; कुर्धे मराठी शाळा

वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्राबल्य असताना, रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावात १३० वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेच्या रूपाने ज्ञानज्योत पेटवली गेली ती सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी. त्या वेळची सामाजिक परिस्थिती पाहता ही घटना म्हणजे क्रांतिकारीच म्हटली पाहिजे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण शाळेची माहिती देत आहेत त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता कुर्ध्यातल्याच राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असलेले उदय श्रीकृष्ण फडके…