रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शहर विभागातर्फे नुकतेच परीस उन्हाळी शिबिर पावसजवळील कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात पार पडले. २२ एप्रिल रोजी या शिबिराचे उद्घाटन ‘अभाविप’चे रत्नागिरी शहराध्यक्ष प्रा. अमोल सहस्रबुद्धे, शाळेचे मुख्याध्यापक उदय फडके आणि शिबिर प्रमुख अनुष्का राणे यांच्या उपस्थितीत झाले.
या शिबिरात फन गेम्स, अॅड मॅड शो, हेरिटेज वॉक, फॉरेस्ट कुकिंग, नाइट वॉक, कॅम्प फायर, मिनी संसद, टीम बिल्डिंग गेम्स, अंताक्षरी, अडथळ्यांची शर्यत, ट्रेजर हंट, निवांत गप्पा, सांस्कृतिक कार्यक्रम, मशाल सत्र, पक्षीनिरीक्षण, अभाविप मांडणी, कौशल्याधारित प्रशिक्षण, मूव्ही रिव्यू आदी उपक्रम आणि माहितीपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

अभाविप कोकण प्रांत सहमंत्री कोमल कुडपकर यांनी ‘अभाविप’बद्दल माहिती दिली. मशाल सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक विवस्वान हेबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समरसता हा विषय मांडला. श्रीकांत ढालकर यांनी विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून दाखवले. या कार्यक्रमामुळे शिबिरात वेगळीच रंगत आली.
याशिवाय शिबिरामध्ये विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. बेस्ट ग्रुप, बेस्ट ग्रुप लीडर, बेस्ट कॅम्पर गर्ल, बेस्ट कॅम्पर बॉय आदी पारितोषिकेदेखील देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शिबिराचा आनंद लुटला. ‘अभाविप’चे रत्नागिरी शहर विद्यार्थी विस्तारक राजस जयवंत यांच्या उपस्थितीत २४ एप्रिल रोजी शिबिराचा समारोप झाला.

