सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप (Live Video)

नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे पहिले सरसेनापती अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना आज (१० डिसेंबर) निरोप दिला जात आहे. त्यांच्यावर नवी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारांचं लाइव्ह प्रसारण दूरदर्शनच्या सौजन्याने येथे देत आहोत.

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे अपघाती निधन; पत्नीसह हेलिकॉप्टरमधील अन्य १२ जणांचाही मृत्यू

नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे पहिले आणि विद्यमान सरसेनापती अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्याचं अखेर भारतीय हवाई दलाकडून नुकतंच ट्विटरवरून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य ११ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत.