सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती होणार आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती होणार आहेत.
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१२ मे २०२५) देशवासीयांशी संवाद साधत आहेत. पाहा सोबतच्या व्हिडिओत…
अखेर आज (१० मे) दुपारी पाकिस्तानला उपरती झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या ‘डीजीएमओं’ना फोन करून चर्चा केली. त्या चर्चेत असे ठरवण्यात आले, की दोन्ही देशांकडून सर्व प्रकारची (जमीन, हवाई आणि सागरी) लष्करी कारवाई आज सायंकाळी (१० मे ) पाच वाजल्यापासून थांबवण्यात येईल.
नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे पहिले सरसेनापती अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना आज (१० डिसेंबर) निरोप दिला जात आहे. त्यांच्यावर नवी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारांचं लाइव्ह प्रसारण दूरदर्शनच्या सौजन्याने येथे देत आहोत.
नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे पहिले आणि विद्यमान सरसेनापती अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्याचं अखेर भारतीय हवाई दलाकडून नुकतंच ट्विटरवरून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य ११ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याशी जवळचा संबंध असलेल्या बलवंत साप्ताहिकाच्या यूट्यूब चॅनेलमुळे कोकणासारख्या मागास भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.