पंतप्रधानांशी संवादाने रत्नागिरीतील शेतकरी भारावला

रत्नागिरी : पीएम किसान निधीच्या नवव्या टप्प्याच्या वितरणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील काही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यामध्ये रत्नागिरीतील देवेंद्र झापडेकर या शेतकऱ्याचा समावेश होता. पंतप्रधानांशी थेट संवाद झाल्याने हा शेतकरी भारावून गेला आणि या संवादातून आपल्याला आणखी नवे काही करण्याचे प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी पीएम केअर्स योजना

नवी दिल्ली : कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी केंद्र शासनाच्या पीएम केअर्स योजनेचा लाभ मिळवून देता येईल. पात्र बालकांविषयी कोणताही नागरिक प्रशासनाला माहिती कळवू शकेल आणि संबंधित बालकाला योजनेचा लाभ मिळवून देऊ शकेल.

राज्याचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकले, भेटीने समाधान – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतले. त्यांच्या भेटीने मी आणि माझे सहकारी समाधान आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.