कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी पीएम केअर्स योजना

नवी दिल्ली : कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी केंद्र शासनाच्या पीएम केअर्स योजनेचा लाभ मिळवून देता येईल. पात्र बालकांविषयी कोणताही नागरिक प्रशासनाला माहिती कळवू शकेल आणि संबंधित बालकाला योजनेचा लाभ मिळवून देऊ शकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मे २०२१ रोजी बालकांसाठी पीएम केअर्स योजना जाहीर केली. गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या कोविड महामारीच्या कालावधीत दोन्ही जन्मदाते वा कायदेशीर पालक वा दत्तक पालक किंवा एकमेव असलेला पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.

बालकांसाठी कायमस्वरूपी सर्वंकष आधार आणि संरक्षणाची हमी देत आरोग्य विम्याच्या माध्यमातून त्यांचे कल्याण साधत, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करत २३ वर्षे वय गाठताना त्यांना आर्थिक साहाय्याच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. केंद्रीय स्तरावर ही योजना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जात आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अल्पवयीन न्यायदानाच्या बाबींशी संलग्न विभाग या योजनेचा राज्यस्तरावरील मध्यस्थ असेल. ही योजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा दंडाधिकारी सक्षम मध्यस्थ अधिकारी असतील.

या योजनेविषयी https://pmcaresforchildren.in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती मिळेल. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गेल्या १५ जुलै रोजी या योजनेची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी पात्र बालकांचा शोध घेऊन त्यांची पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेसाठी पात्र बालकांबद्दल कोणताही नागरिक प्रशासनाला या पोर्टलच्या माहिती कळवू शकेल.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply