रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २०० रुग्ण, १८१ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३ ऑगस्ट) १८१ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६७ हजार ६५१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.८६ झाली आहे. आज नव्या ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज नवे २०० करोनाबाधित रुग्ण आढळले. आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार ५२९ नमुन्यांपैकी दोन हजार ४६८ अहवाल निगेटिव्ह, तर ६१ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ३१८ पैकी दोन हजार १३९ अहवाल निगेटिव्ह, तर १३९ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २०० पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७२ हजार ७६ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ३१ हजार ७५७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज दोन हजार १७० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ७६२, तर लक्षणे असलेले ४०८ रुग्ण आहेत. एक हजार ५७ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६९७, डीसीएचसीमधील १७६, तर डीसीएचमध्ये २३२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १८६ जण ऑक्सिजनवर, ६८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आजच्या २ आणि यापूर्वीच्या २ अशा एकूण ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून तो २.९२ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १०५ एवढी आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७६३, तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७५९ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८०, खेड १८४, गुहागर १५४, चिपळूण ३९९, संगमेश्वर १८४, रत्नागिरी ७२१, लांजा ११२, राजापूर १४०. (एकूण २१०५).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply