सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३ ऑगस्ट) करोनाचे नवे १०२ रुग्ण आढळले, तर २३२ म्हणजे दुपटीहून अधिक रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्याबाहेर तपासणी केलेल्या दोघा रुग्णांसह १०२ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ हजार ७१२ झाली असून ४५ हजार ५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात सध्या दोन हजार ३९८ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३२७, दोडामार्ग ६५, कणकवली ४५०, कुडाळ ६६८, मालवण ३२२, सावंतवाडी २५८, वैभववाडी ७२, वेंगुर्ले १३९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ९. सक्रिय रुग्णांपैकी १२५ रुग्ण ऑक्सिजनवर तर २७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १९, दोडामार्ग – ७, कणकवली – १२, कुडाळ – २९, मालवण – ३, सावंतवाडी – १३, वैभववाडी – ४, वेंगुर्ले – १५.

आज जिल्ह्यात पूर्वीच्या एका आणि आजच्या ३ अशा ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २५७ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६१, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६१, कुडाळ – १९२, मालवण – २५८, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply