रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी पुनर्वसन कामाला वेग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या जुलैच्या अखेरच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या महापुरानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्वच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आतापर्यंत एकूण १ कोटी ७८ लाख ३६ हजार ८०० रुपयांच्या मदतवाटपाचे काम प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

आता बाधितांचे पुनर्वसन करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये, भांडी, कपडे यासाठी बाधितांना तातडीची मदत म्हणून ८५ लाख ४५ हजार रुपये आणि जखमींना ९१ हजार ८०० रुपये मदत देण्यात आली. खेड तालुक्यात पोसरे येथील भूस्खलन दुर्घटनेत १७ व्यक्ती मरण पावल्या. त्यापैकी १४ जणांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे ५६ लाख रुपयांची मदत देण्यात आली. बिरमणी दुर्घटनेतील २ मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्यात आले.

चिपळूण तालुक्यात ५ जणांचा मृत्यू झाला. यात २० लाख रुपये मदत देण्यात आली आहे. पुराने बाधित १७६९ कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजाराप्रमाणे ८८ लाख ४५ हजारांची मदत देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त पोसरे दुर्घटनेतील जखमी १७ व्यक्तींना ७३ हजार १०० रुपये तर पेढे परशुराम येथील एका जखमी व्यक्तीला १२ हजार ७०० रुपये मदत देण्यात आली आहे.

जुलै २०२१ अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील असा –
मृतसंख्या – ३३ (१२ बुडून, व २१ दरड कोसळून मृत)
आवश्यक अनुदान – १३२ लाख (प्रती मृत व्यक्ती ४ लाख प्रमाणे)
वितरित अनुदान – मृत, जखमींसाठी उणे प्राधिकाराची सुविधा उपलब्ध असल्याने अनुदान उणे पद्धतीने काढण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
जखमींची संख्या – १८
आवश्यक अनुदान – १ लाख ५३ हजार (चिपळूण १ प्रकरणात रु. १२ हजार ७०० व खेड १७ जखमींपैकी ८ प्रकरणात १२ हजार ७०० प्रमाणे १ लाख १ हजार ६०० व ९ प्रकरणात ४ हजार ३०० प्रमाणे ३८ हजार ७०० असे एकूण १ लाख ५३ हजार रुपये.)
पशुधन नुकसान
मोठे दुधाळ – ५२१
लहान दुधाळ – २०२
ओढकाम करणारे मोठे – ८३
ओढकाम करणारे लहान – १६३
कुक्कुटपालन – ४५५३ कोंबडया
आवश्यक अनुदान – २११.४७ लाख

हस्तकला कारागिरांचे नुकसान
हत्यारे/अवजारे नुकसान – संख्या – २४
आवश्यक निधी – ९८ हजार ४००
कच्चा मालाचे नुकसान – संख्या – २४
आवश्यक निधी – ९८ हजार ४००

कपडे/भांडी नुकसान
बाधित कुटुंबांची संख्या – १३१०८
आवश्यक अनुदान – रु.६५५.४० लाख (उणे पद्धतीने प्रति बाधित कुटुंब ५००० रुपयांप्रमाणे अनुदान काढण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.)

पडझड झालेली घरे : पूर्णत: पक्की ५९, कच्ची ५१. एकूण ११०
प्रत्यक्ष नुकसान – रु.४३८.९८ लाख
आवश्यक अनुदान – रु.१०४.६१ लाख (९५१०० रुपये प्रतिघर याप्रमाणे)
अंशत: नुकसान झालेली घरे – पक्की १४८६, कच्ची १३३६. एकूण २८२२
प्रत्यक्ष नुकसान – रु.२३२५.७५ लाख
आवश्यक अनुदान – रु. १६९.३२ लाख (प्रतिघर ६००० रुपये प्रमाणे)

झोपड्या
एकूण नुकसान – ६७
प्रत्यक्ष नुकसान- रु.९.९० लाख
आवश्यक अनुदान – रु. ४.०२ लाख (प्रतिझोपडी ६००० रुपयेप्रमाणे)

गोठे
एकूण नुकसान – ३७०
प्रत्यक्ष नुकसान – रु.४७७.६० लाख
आवश्यक अनुदान – रु. ७.७७ लाख (प्रतिगोठा रु.२१००/-)

घरासाठी एकूण आवश्यक अनुदान – रु.२८५.७२ लाख

मदत छावण्या
संख्या – ६८
सुरू करण्यात आलेल्या दिवसाची सरासरी – १५ दिवस
एका दिवसाला छावण्यांत असणारे सरासरी लोक – २४९३
एकूण खर्च – रु. ७३.१५ लाख
प्राप्त अनुदान – रु. १ कोटी

कचरा उचलणे
बाधित गावे २१
प्राप्त अनुदान – रु.१ कोटी

मत्स्य विभाग
नुकसान – १. अंशत: होडी – ४
पूर्णत होडी- ६
अंशत: जाळी-४
पूर्णतः जाळी -७
मत्स्यशेती -०.१० हे.आर.
एकूण आवश्यक अनुदान – रु.१.०१४२ लाख

शेती
शेतजमीन खरडणे/खचणे – क्षेत्र १९०.७५ हे.आर.
शेतजमिनीवर गाळ साचून नुकसान – क्षेत्र ४८०.८६ हे.आर
आवश्यक अनुदान – शेत जमीन खरडणे/खचणे – रु.७१.५३ लाख (रु.३७५००/- प्रति हे.आर. प्रमाणे )
शेत जमिनीवर गाळ साचून नुकसान – ५६.२३ लाख
(रु.१२२००/- प्रति हे.आर. प्रमाणे)
एकूण आवश्यक अनुदान – रु.१२७.७६ लाख

सार्वजनिक मालमत्ता नुकसान
महावितरण – ३४४ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग – १३१०५.१५ लाख,
राष्ट्रीय महामार्ग – १४७० लाख, जिल्हा परिषद – ७४६९.७२ लाख,
वन विभाग – ३४.८४ लाख, पोलीस विभाग – ३९.७६ लाख,
पाटबंधारे विभाग – ११४६ लाख, नगरपालिका/नगरपरिषद – ५३७७ लाख,
एसटी महामंडळ – ३२६.४९ लाख.
एकूण २९३१२.९६ लाख.

वाहनांचे नुकसान
दुचाकी, चारचाकी वाहने ४८५४ (चिपळूण), २५ (खेड)

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत दिलेली मदत
धान्य वाटप – गहू – १७५ क्विंटल, तांदूळ – १७५ क्विंटल, वाटप केलेली बाधित गावे – २००, वाटप केलेली बाधित कुटुंबे १७५१
शिवभोजन थाळी वाटप – ऑनलाइन – २५९८२, ऑफलाइन – २१४१

केरोसीन वाटप १८१० लिटर
वाटप केलेली बाधित गावे – ४४
वाटप केलेली बाधित कुटुंबे – ३६२

स्वच्छता आणि आरोग्य
चिपळूण आणि खेड नगरपालिकांमध्ये आणि ग्रामीण परिसरामध्ये स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आली असून चिपळूण आणि परिसरात ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच खेड आणि परिसरात १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

चिपळूण, खेड आणि परिसरातील पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा १०० टक्के पूर्ववत करण्यात आला आहे.

पुरानंतरची स्थिती आणि नियंत्रण
चिपळूण आणि खेड नगरपालिका तसेच परिसरातमध्ये पूरस्थिती ओसरल्यानंतर साथीचे रोग होऊ नयेत, म्हणून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन साथीच्या रोगाच्या आणि डेंग्यू आणि लेप्टोस्पायरॉसिसच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१. पाणी शुद्धीकरण
२. घरोघरी मेडिक्लोअरचे वाटप
३. साथीच्या रोगासंबंधी जनजागृती व उपचार
४. जंतुनाशक फवारणी आणि ब्लीचिंगा डीटीटीचे फॉगिंग

चिपळूण शहर आणि परिसरामध्ये आरोग्य तपासणीसाठी ३४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत २१३२२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यामध्ये ६६०४० लोकांचा समावेश आहे. एकूण ८६९४० कॅप्सूलचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी लक्षणे असणाऱ्या १४४९० रुग्णांना कॅप्सूल, डॉक्सी प्रॉफिलॅक्सीसचे वाटप करण्यात आले आहे.
तपासणी करण्यात आलेले रुग्ण- २१८३७

खेड शहर आणि परिसरातही तपासणी आणि औषधांचे वाटप सुरू असून ५ पथके कार्यरत आहेत.

सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून मदत –
एकूण सामाजिक संस्था- ११३
दानशूर व्यक्ती-२५

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply