रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (४ ऑगस्ट) नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ, तर करोनामुक्तांच्या संख्येत घट झाली.

आज ७७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६७ हजार ७२८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.६७ झाली आहे. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

आज नवे २२९ करोनाबाधित रुग्ण आढळले. आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार २२५ नमुन्यांपैकी दोन हजार १०० अहवाल निगेटिव्ह, तर १२५ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ७९१ पैकी दोन हजार ६८७ अहवाल निगेटिव्ह, तर १०४ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २२९ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७२ हजार ३०५ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ३६ हजार ५४४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज दोन हजार २६५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ८६६, तर लक्षणे असलेले ३९९ रुग्ण आहेत. एक हजार १३३ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७२७, डीसीएचसीमधील १७०, तर डीसीएचमध्ये २२९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४५ जण ऑक्सिजनवर, ६९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज रत्नागिरी तालुक्यातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून तो २.९१ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १०६ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७६४, तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७५९ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८०, खेड १८४, गुहागर १५४, चिपळूण ३९९, संगमेश्वर १८४, रत्नागिरी ७२२, लांजा ११२, राजापूर १४०. (एकूण २१०६).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply