सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या मृतांची संख्या शून्य

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ ऑगस्ट) करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली नाही. नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्याही अधिक असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्याबाहेरील लॅबमधील एकाच्या तपासणीसह आज करोनाचे नवे १०५ रुग्ण आढळले, तर १९५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ हजार ८१७ झाली असून ४५ हजार २५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या दोन हजार ३०६ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३३७, दोडामार्ग ६१, कणकवली ४३०, कुडाळ ६१८, मालवण २९८, सावंतवाडी २६७, वैभववाडी १३५, वेंगुर्ले १४३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ९. सक्रिय रुग्णांपैकी १२१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १६, दोडामार्ग – १, कणकवली – १६, कुडाळ – १७, मालवण – २०, सावंतवाडी – २३, वैभववाडी – ६, वेंगुर्ले – ५, जिल्ह्याबाहेरील १.

आज जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २५९ एवढी आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६१, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६१, कुडाळ – १९२, मालवण – २५८, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply