dispenser with soap and corona word

सीएम केअर योजनेची गरज

माय राजापूर या संस्थेने राजापूर तालुक्यात या समस्येचा आढावा घेतला आणि शक्य असेल तेवढी मदत अशा कुटुंबांना केली. पण ती तात्पुरत्या स्वरूपाची आणि प्रासंगिक मदत होती. इतरही काही सामाजिक संस्थांनी तात्पुरत्या स्वरूपाची मदत केली. पण अशा संस्था दीर्घकाळ मदत करू शकत नाहीत. त्याची जबाबदारी शासनानेच घ्यायला हवी. तशा योजनेचा तातडीने अभ्यास करून राज्य शासनाने सीएम केअर योजना आखण्याची गरज आहे.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी पीएम केअर्स योजना

नवी दिल्ली : कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी केंद्र शासनाच्या पीएम केअर्स योजनेचा लाभ मिळवून देता येईल. पात्र बालकांविषयी कोणताही नागरिक प्रशासनाला माहिती कळवू शकेल आणि संबंधित बालकाला योजनेचा लाभ मिळवून देऊ शकेल.

पीएम केअर्स निधी विरुद्ध मुख्यमंत्री निधी; राजकारण पेटवणाऱ्यांकडून केवळ दिशाभूल

मुंबई : ‘केवळ पीएम केअर्स निधीला दिलेली मदतच ‘सीएसआर’अंतर्गत ग्राह्य धरली जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेली मदत त्याअंतर्गत गृहीत धरली जाणार नाही. करोना संसर्गाच्या सध्याच्या परिस्थितीतही राजकारण करण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे,’ अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र यूपीए सरकारने कायद्यात केलेली सुधारणा यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण पेटवू पाहणारे विरोधक तोंडावर पडले आहेत.