सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे १०४ रुग्ण, ४४ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२ ऑगस्ट) करोनाचे नवे १०४ रुग्ण आढळले, तर ४४ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्याबाहेर तपासणी केलेल्या एका रुग्णांसह १०४ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील बाधिकांची संख्या ४८ हजार ६१० झाली असून ४४ हजार ८२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात सध्या दोन हजार ५३२ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३४४, दोडामार्ग ५८, कणकवली ४७०, कुडाळ ६९१, मालवण ३६९, सावंतवाडी २८२, वैभववाडी २६९, वेंगुर्ले १४७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १७. सक्रिय रुग्णांपैकी १३२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २०, दोडामार्ग – ५, कणकवली – २७, कुडाळ – २०, मालवण – ८, सावंतवाडी – १५, वैभववाडी – १, वेंगुर्ले – ६, जिल्ह्याबाहेरील २.

आज जिल्ह्यात कणकवलीतील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २५३ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६०, दोडामार्ग – ३५, कणकवली – २५९, कुडाळ – १९२, मालवण – २५८, सावंतवाडी – १७१, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply