संगमेश्वरातील वीजपुरवठा उद्या दुपारी सुरू होणार

संगमेश्वरजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे आज (२१ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले.

रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडले मॉक ड्रिल

संभाव्य युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजनानुसार आज (सात मे) देशभरात ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल पार पडले. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हे मॉक ड्रिल झाले. त्यात रत्नागिरी तहसील कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत, दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका, रत्नागिरी रेल्वे स्टेशन या ठिकाणांसह जेएसडब्ल्यू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख चार कंपन्यांचाही समावेश होता.

कसब्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या निधीला पावसाळी अधिवेशनात मिळणार मंजुरी; अजित पवारांनी केली पाहणी

संगमेश्वर : ‘रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं उभारण्यात येणार असलेलं स्मारक राष्ट्रीय दर्जाचं आणि ऐतिहासिक व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्मारक भव्य-दिव्य होण्याकरिता पुरातत्त्व आणि बांधकाम विभागाने मोठमोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि भव्यता कशी आणता येईल, हे पाहावं. ३० जूनला सुरू होणार असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्मारकासाठीच्या निधीला मंजुरी द्यायची आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२७ एप्रिल) दिली.

तिसरा कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव ६ ते ८ डिसेंबरला

संगमेश्वर : कलांगण-संगमेश्वर आणि श्री कर्णेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा कला-संगीत महोत्सव येत्या ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

देवरूखचे मदन मोडक यांची वनवासी कार्याला १.११ कोटीची देणगी

देवरूख : येथील रहिवासी मदन वामनराव मोडक आणि सौ. मंजिरी मदन मोडक यांनी नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हाती नुकताच सुपूर्द केला.

कर्णेश्वर मंदिरात २२ डिसेंबरपासून कला संगीत महोत्सव

संगमेश्वर : कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिरात येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत कला संगीत महोत्सव होणार आहे.