सुरंगी

साप्ताहिक कोकण मीडियाने २०१९च्या दिवाळी अंकासाठी घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेत गोव्यातील सिद्धी नितीन महाजन यांनी लिहिलेल्या ‘सुरंगी’ या कोकणी बोलीतील कथेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तीच ही कथा…

‘मावशे, आबोली वळेसार कसो दिला गे?’

समोर आलेल्या गिऱ्हाइकाच्या आवाजाने शेवंता मावशी भानावर आली… तशी शांतादुर्गेच्या देवळात कायमच गर्दी असायची. आज देवळात पंचमी असल्याने सकाळपासून भाविकांची जास्त गर्दी होती. सुट्टीचा मोसम असल्याने पर्यटकांचा राबताही होताच. सकाळपासून विकायला ठेवलेले हार, गजरे आता संपत आले होते.

सूर्य कलत आला. समोरच्या तळ्यातल्या या सावल्या लांबलांब व्हायला लागल्या, तशी मावशी उठली. समोरचे फटकूर तिने झडाझड झाडून घेतले, खाली पडलेल्या कचऱ्यावर सान मारली आणि सामानसुमान गोळा करून देवळापुढचा उतार उतरू लागली. शेजारच्या खण-नारळ विकणाऱ्या जाणत्याने तिला हटकले,

‘मावशे, आयज बेगीन वता गे?’

‘हरी येवपाचो आसा रे.’

‘मागीर बरे नुस्त्या हुमन आसाशे दिसता.’

‘ना र, बिरस्तार न्हय रे आयज?’

‘हय मगे. शिवराक खावपा लायतली दिसता चल्याक, इतल्या वरसानी येता तर?’

मावशी हसून वाटेला लागली. जाणता मात्र तिच्या वाटेकडे किती तरी वेळ बघत राहिला.

वाटेत मावशीची विचारचक्रे फिरत होती.

हरी येणार, कती वर्षांनी येणार.

‘मजो पूत येतलो, म्हाका भांगरान न्हानयेतलो. मागीर हाव तेच्याखातीर एक बरी बायल सोदतले. इतली वर्सा कष्ट करून काडली, आता खय माका बरे दिस पळोवपा मेळतले.’ ती वाड्यावर सगळ्यांना सांगायची.

सुरंगी
Photo Credit : Dinesh Valke

यथावकाश हरीचे लग्न झाले.

अन् मावशीला बरी कसली, लाखात एक सून मिळाली होती.

चंपा, चाफेकळी कशी. तिच्या येण्याने तो छोटासा वाडा घमघमून जायचा. फुले तिच्या आवडीची. त्यात सुरंगी तर बेहद आवडीची.

चंपा सून म्हणून आली, तेव्हा रिकाम्या लोकांनी सासू-सुनेच्या नात्याबद्दल मावशीचे खूप कान भरले होते; मात्र तिला पाय घरात ठेवलंला बघून, मावशीला आपल्याला नसलेली मुलगीच घरात आल्यासारखी वाटली होती. अन् चंपा पण तिच्या विश्वासाला जागली.

‘म्हजे बाय चंपा, कितले गोड चली गे. सगळी कामा बरी करून करतले, बरे करून उलयतले. फुलांचेर ताजो जीव आसा.’ मावशी सांगे.

आज मावशीने आपल्या फुलांतून दोन सुरंगी वळेसर बांधून तिच्यासाठी आणले होते.

डोक्यात विचारचक्र घेऊन ती दिवसभराची कामे उरकायला लागली. परवा चवथ. माटवी लावायची होती. एरव्ही तिच्या घरी चवथीदिवशी ती एकटीच असायची, एकटीच सगळं करायची. जवळच सारे नातवाईक दूर दूर पांगले होते.
मग मावशी एकट्यानेच सगळं आवरे. शेजारच्या चंदूला माटवी बांधायला सागे. आपल्या गणपतीबरोबर तो मावशीचाही गणपती आणून देई. शेजारची वत्सलकाकी नेवऱ्या करायच्या मदतीला येई.

विसर्जनाच्या वेळी मात्र मावशीला आपल्या सगळ्या नात्यागोत्याची हटकून आठवण येई, अन् तिचे डोळे पाणावत. सखाराम गेल्यावर तिने बरेच कष्ट उपसून, फुलांचे हार, गजरे विकून संसार चालवला आणि हरीला मोठं केलं होतं.
तोच तिचा हरी उद्या येणार होता.

सुरंगीची फुलं म्हणे खूप उंचावर असतात. त्यांचा वळेसर करायचा तर खूप उंच चढावं लागतं, आणि न कुस्करता ती काढावी लागतात, सकाळी सकाळी. मावशी इतकी वर्षं खपून ती काढत आली होती, न कुस्करता, तसंच तिच्या आयुष्याचं.
हरी आणि चंपा, आणि प्रथमेश, तिचा नातूपण येणार होता.

सहज तिची नजर बाजूच्या कोपऱ्याकडे गेली. परवा इथे बाप्पा विराजमान होणार, अन् तिचा छोटा बाप्पा, तिचा नातू प्रथमेशपण आजी-आजी करून तिच्या अवतीभवती वावरणार.

स्टूल लावून माळ्यावरची बाबूची खेळणी काढून घ्यायला हवीत. सदा आल्यावर त्याला सांगायला हवं.

सुरंगी ओट्यावर ठेवलीय.

तशीच राहूंदे म्हणजे झालं, बावूदे नको.

दार वाजल्याचा आवाज आला. वत्सलकाकी आली होती.

‘आज म्हळे माश्शे पासय मारून येता तुमगेर. पोळवया तरी कीदे शिजता चुलीवयर?’

‘तशी व्हड कीदे ना गे, हरी, सूनबाय आणि बाबू येतलो न्हय, तांजे खातीर सांना करतले तवश्याची. बाबूक खूप आवडतत न्हय?’

‘आगे अशे? मागीर हांव तुका मदत करता मगे. सामान हाडले न्हय?’ असे म्हणून सवयीनेच वत्सलकाकी स्वयंपाकघरातल्या कोनाड्याकडे वळली. सामानसुमान घेतले आणि नेवऱ्यांची तयारी करू लागली.

‘आज आमगेर पावण आयला गे एक, ते पूण येतले तुका मदत करपा म्हजेवांगडा.’

‘बरे जाले गे बाय. आमच्या चंपाक कोणतरी उलोवपा मेळ्ळे.’

‘हं’ असा निःश्वास सोडत वत्सलकाकी कामाला लागली. एव्हाना देवळातला सायंचौघडा वाजला असेल. दिवलागण व्हायला आली आहे.

ओट्यावरच्या सुरंगीचा घमघमाट नाकात भरून राहिला आहे. सुरंगीवर कुणा जनावराची नजर पडायला नको.

दार परत एकदा वाजलं.

पाव्हणी दाराशी आली. तिच्या चाहुलीने वत्सलकाकी उठून उभी राहिली.

‘हे आमगेले शामल गे मावशे, म्हज्या भयणिले चली. स्कला शिकयता पणजे.’

‘आशे? खयचे इस्कॉल गो?’

‘शारदा मंदिर.’

‘आगे म्हज्या बाबूक शिकयता मगे तू?’

‘आगे ना गे, ते खयचे दुसरे इस्कॉल असतले. मळ्या रावता मग तुजो पूत?’ वत्सलकाकी जरा बावचळली. मावशीच्या डोळ्यात आता माया भरली होती.

‘आगे ना गे, शारदा मंदरान शिकता बाबू. तू शिकयता असतले. आमच्या बाबूले टीचर.’

काकीने आवंढा गिळलेला शामलने टिपला.

काकी अस्वस्थ झाली होती.

सुरंगीचा वळेसर छान गुंफला आहे, तो तसाच दरवळत राहू दे. मावशी आता एका नव्या उत्साहाने बोलू लागली.

‘पळय गे टीचर, आमगेलो बाबू सवेन आसा. मातसो मोटवो, आनी दिसपा सामको गुटगुटीत क्रीश्न कसो. ताजो आवाज गोड आसा, सामको ताज्या आज्या बशेन. ताका म्हाका गायनाच्या क्लासिक घालपा जाय. पूण मातसो गणित बी शिकपा हळू आसा. ‘

‘ताजेकडे लक्ष दे हा टीचर. फुडाराक वसून व्हड मनीस करपाचो आसा, बाबू हुशार आसा गे, पूण खूप मस्ती आसा. आवय बापायक पूण केंना केंना आयकना.’

म्हातारीचे डोळे दरवाजाकडे लागले होते. हनुवटीवर मूठ ठेवून ती आता बोलण्यात रंगून गेली.

‘बाबूक व्हडलो हपीसर करतल हांव. खूप खूप शिकून तो मुंबई वसून व्हडलो बंगलो बांदतलो.
व्हडली गाडी घेवन फिरतलो. केंनातरी घरा येतलो, आवय बापायक घेवन.’

म्हातारीच्या प्रत्येक शब्दानिशी काकीची चुळबूळ वाढली. शेवटी ती घरी जायचं कारण शोधू लागली.

पाव्हणीला काकीची अस्वस्थता कळेना; पण आपल्याही मनाची अशी घालमेल का होतेय हेही कळेना.

इकडे म्हातारी बोलतच होती.

‘मागीर म्हजो बाबू घरा येतलो, तेन्ना ही घराफुडली शेवती, आबोली कितली फुलोन व्हावतली. दाराफुडली केळी, माड खूप बरे लागतले. मोती कुत्रो बाबूक वळकपा ना, पूण एकदा वळक जाली की भुकत, शेपडी हालायत रावतलो खोशियेन.’
काकीने आता शामलचा हात धरला, अन् ती घाईगडबडीने उठली, ‘आगे मावशे, दूद दवरला गे गॅसवयर. वतून बी जायत, म्हाका वसपा जाय.’

शामल गोंधळात पडली. कुजबुजत म्हणाली, ‘आगे पण दूद तर हाव बंद करून आयला.’

म्हातारीची बडबड चालूच होती, ‘आगो आयकून जा तर. मागीर आमचो बाबू घराच्या दारार लायलली पाटी पळयतलो, ताज्या आज्जेच्या मोगाळ फुलांबशेन नाजूक नाव बरयलेली.’

‘डॉ. प्रथमेश हरी सावंत’

अन् आठवणींचा पडदा सर्रकन वीज लख्ख पडून उजळावा, तसं ते नाव, अन् तो चेहरा शामलच्या डोळ्यांसमोर चमकून गेला.

तो पांढरा शर्ट, ते निळे डोळे. काही तरी ओळखीचं वाटलं होतं तिला तेव्हाच.

झटकन उठून ती काकीबरोबर दरवाजाबाहेर आली, ती थरथरणाऱ्या हातांनी.

‘सुरंगीच्या वळसाराक केंनाचीच नजर लागला गो, शामल.’

‘काकूट दिसता म्हातारीची. हरी येवपा ना गे. सून आणि बाबू पूण ना. केंनाच ना.’

वत्सलकाकीच्या डोळ्यांत खळ्कन पाणी आलं.

पाव्हणीच्या हातातली पातेली खाली पडली. तिच्या डोळ्यासमोर तो आठवणींचा पट उभा राहिला, तो सहावीचा वर्ग ..
अन् ती दोन मिनिटं पाळलेली शांतता.

‘चार वर्सा जाली. त्या चवथेक हरी, ताजी बायल आणि पूत येताले गाडी करून. वाटेन गाडीक एका ट्रकान उडयले मगे, आन….’

वत्सलकाकीला हुंदका कोंडेना.

ओट्यावरची सुरंगीची वेणी विखरून तिची पिवळट लहान फुलं इतस्ततः पडली होती…

सिद्धी नितीन महाजन, बांदोडा, फोंडा, गोवा – ४०३४०१
मोबाइल : ९४०५९ २०२१८
ई-मेल : snmhjn33@gmail.com

(या कथेचा ऑडिओ सोबत देत आहोत.)

One comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s