कलमठमधील ‘नाडकर्ण्यांच्या वाड्या’चे वैभव अनुभवा ई-बुकमधून…

कणकवली (जि. सिंधुदुर्ग)तालुक्यातील कलमठ गावात ४० खोल्यांचा, दुमजली, चौसोपी, अवाढव्य असा नाडकर्ण्यांचा वाडा होता. भावी पिढीला नाडकर्ण्यांचे हे वैभव कळावे, त्यांना वाडा अनुभवता यावा म्हणून सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर यांनी ‘नाडकर्ण्यांचा वाडा’ हे छोटे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाविषयी…
……..
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील कलमठ गाव. या गावात ४० खोल्यांचा, दुमजली, चौसोपी, अवाढव्य असा नाडकर्ण्यांचा वाडा होता. या वाड्याचे प्रवेशद्वार म्हणजे दिंडी दरवाजा हा एवढा प्रशस्त होता, की हत्तीच्या अंबारीसह या दरवाज्यातून अंगणात येता येत होते. यावरून वाड्याचा प्रशस्तपणा लक्षात येईल. दुमजली असलेल्या या वाड्यात दिंडी दरवाजावरती नगारखाना होता. वाड्यामागे घोड्यांची पाग होती. माती आणि लाकूड या दोनच गोष्टींचा वापर करून वाड्याचे बांधकाम केलेले होते. तळमजल्यावरील खोल्या पंधरा फूट उंचीच्या व त्यावर तेवढ्याच उंचीचा पहिला मजला. पावसात नळ्यांच्या छपरावरून गळणार्‍या पागोळ्यांचे पाणी पावळ्यात यायचे तेथून दगडांच्या अंडरग्राऊंड व्यवस्थेतून वाड्यामागील तळ्यात हे पाणी सोडले जायचे. या वाड्याच्या स्थापत्यकाराला निश्‍चितच दाद द्यायला हवी.

हा वाडा नक्की कधी बांधला गेला याबाबत निश्‍चित माहिती नाही. परंतु वाड्याच्या देवघरातील पितळी साळुंखीवर स्थापना शके १७३० असा उल्लेख आहे. म्हणजे कदाचित त्यापूर्वीच हा वाडा उभा राहिला असावा. या वाड्यातच माझा जन्म झाला. इथेच मी खेळले, बागडले, शिकले, मोठी झाले. इतकी वर्षे झाली तरीही माझ्या मनातल्या या वाड्याबद्दलच्या आठवणी आजही ताज्या आहेत. भावी पिढीला नाडकर्ण्यांचे हे वैभव कळावे, त्यांना वाडा अनुभवता यावा म्हणून ‘नाडकर्ण्यांचा वाडा’ हे छोटे पुस्तक लिहिले आहे.

  • सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर

    (नाडकर्ण्यांचा वाडा हे सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर यांनी लिहिलेले पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा. हे ई-बुक गुगल प्ले-बुक्सवरही उपलब्ध असून, तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply