दोन जुलै २०१९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तिवरे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील धरण फुटले आणि होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेने २२ जणांचा बळी घेतला आणि गावातील सगळ्यांचेच संसार उद्ध्वस्त झाले. त्या जखमा कधीही पुसल्या जाणार नाहीत, हे खरेच; पण शासन आणि प्रशासनानेही त्यांच्यासाठी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्या संदर्भातील कोणतीच बाब वर्षभरात पूर्णत्वास गेलेली नाही. पुनर्वसनासाठी फेरोसिमेंटची मजबूत आणि किफायतशीर घरे बांधून देण्याचा प्रस्ताव फेरोसिमेंट सोसायटीने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता; त्यानुसार त्यांनी सकारात्मकताही दर्शवली होती. मात्र तेही काम पुढे सरकलेले नाही. एकंदरीतच, तिवरेवासीयांना पुन्हा नव्याने उभे करण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.
त्या दुर्घटनेची भीषणता दर्शविणारा व्हिडिओ…
फेरोसिमेंटच्या घरांच्या प्रस्तावाबद्दलचा व्हिडिओ…
धरणफुटीनंतर आपल्या मालकाच्या घराच्या चौथऱ्यावर झोपलेला कुत्रा
……………………
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media