Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; आज २१ करोनाबाधित; सिंधुदुर्गात आठ नवे रुग्ण

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत नियंत्रणात होते; मात्र आज (२० नोव्हेंबर) २१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. २७ ऑक्टोबरनंतर प्रथमच एका दिवसात २०हून अधिक रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरीत आज (२० नोव्हेंबर) २१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर सहा जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज आठ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २६ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० नोव्हेंबर) सहा रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८१५८ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.४३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज २१ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८६३९ झाली आहे. बाधितांचा दर १४.३५ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ६, चिपळूण ३, लांजा १ (एकूण १०); रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी १०, चिपळूण १ (एकूण ११) (दोन्ही मिळून २१)

सध्या ८७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६९ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० नोव्हेंबर) आठ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५१२३ झाली आहे. सध्या १४४ जण उपचारांखाली आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ४८३५ आहे. आज सावंतवाडी तालुक्यात एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील १३८ जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version