रत्नागिरीत आठ, तर सिंधुदुर्गात १२ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ नोव्हेंबर) आठ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर चार जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १० जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ नोव्हेंबर) चार रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८१५२ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.५९ टक्के आहे.

जिल्ह्यात आज आठ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८६१८ झाली आहे. बाधितांचा दर १४.४१ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – संगमेश्वर २ (एकूण २); रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी २, गुहागर ४ (एकूण ६) (दोन्ही मिळून ८)

सध्या ७६ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २० जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७० टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ नोव्हेंबर) १२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५११५ झाली आहे. सध्या १६३ जण उपचारांखाली आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ४८०९ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३७ जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply