Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीतील सक्रिय करोनाबाधित पुन्हा १००हून अधिक; सिंधुदुर्गात ३१ नवे रुग्ण

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : दिवाळीनंतर करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा पॅटर्न कोकणातही पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या चार नोव्हेंबर रोजी १००पेक्षा कमी झाली होती. त्यानंतर त्या संख्येने आज (२१ नोव्हेंबर) पुन्हा १००चा टप्पा ओलांडला आहे. रत्नागिरीत आज (२१ नोव्हेंबर) १४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ३१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर चार जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ नोव्हेंबर) तीन रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८१६१ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.३१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १४ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८६५३ झाली आहे. बाधितांचा दर १४.२० टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ९, दापोली १, गुहागर १, चिपळूण ३ (एकूण १४)

सध्या १०१ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६८ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ नोव्हेंबर) ३१ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५१५४ झाली आहे. सध्या १७१ जण उपचारांखाली आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ४८३९ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३८ जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version