करोनाचे रत्नागिरीत २१, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२५ नोव्हेंबर) २१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २१ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ नोव्हेंबर) करोनाचे नवे २१ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८७१० झाली आहे. बाधितांचा दर १३.८९ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४, दापोली १, खेड १, मंडणगड १० (एकूण १६). रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी १, दापोली १, चिपळूण २, संगमेश्वर १, मंडणगड २ (एकूण ५). (दोन्ही मिळून २१).

जिल्ह्यात आज तीन रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८२०९ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.२४ टक्के आहे. सध्या १०४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २० जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ नोव्हेंबर) १२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५२०४ झाली आहे. सध्या १८५ जण उपचारांखाली आहेत. आज २१ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ४८७१ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४० जणांची करोनाविरुद्धची लढाई दुर्दैवाने अयशस्वी ठरली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply