रत्नागिरीतील सक्रिय करोनाबाधितांची संख्या पुन्हा १००पेक्षा कमी

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१४ डिसेंबर) ४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर एक जण करोनामुक्त झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा १००पेक्षा कमी झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ डिसेंबर) करोनाचे नवे चार रुग्ण आढळले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८९६४ झाली आहे. आज तपासलेल्या अन्य १६१ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर १३.५८ टक्के आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४

जिल्ह्यात आज १८ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८५१३ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.९६ टक्के आहे. सध्या ८६ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २९ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

करोनाची साथ सुरू झाल्यानंतर रत्नागिरीतील सक्रिय रुग्णांची संख्या चार नोव्हेंबर २०२० रोजी प्रथमच १००पेक्षा कमी झाली होती; मात्र २१ नोव्हेंबरला या संख्येनेे पुन्हा १००चा टप्पा ओलांडला होता. आज पुन्हा सक्रिय रुग्णांची (म्हणजे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची) संख्या १००पेक्षा कमी झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३२२ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.५९ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ डिसेंबर) २९ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५६२१ झाली आहे. सध्या ३७८ जण उपचारांखाली आहेत. आज एक जण करोनामुक्त झाला असून, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ५०८७ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply