चिपळूण : विद्याभारती चिपळूणतर्फे मैत्री मातृभूमीशी नावाचे शिबिर दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी आयोजित केले आहे.
दिवसभराची धावपळ, अभ्यासाचा भरमसाट व्याप, दगदग आणि फास्टफूडच्या जीवनशैलीत आपल्यासमोर आणि मुलांसमोर आव्हाने आणि अडचणीच जास्त असल्याचे जाणवते. आयुष्य खरेच इतके गुंतागुतीचे आहे का, आरोग्यविषयक इतके गंभीर प्रश्न आहेत का, असतीलच तर का, याचे उत्तर म्हणजे शिक्षणाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास आपण घडूच देत नाही. त्याला विविधांगांनी विकसित होऊच देत नाही. मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे, त्यांना आनंदी आणि तणावमुक्त, दिलखुलास, मस्त वावरता यावे, सोबत आपली संस्कृतीही जपता यावी यासाठी विद्याभारती चिपळूणतर्फे मैत्री मातृभूमीशी… Let’s visit our roots या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीत, मैदानी खेळ, आयुर्वेद, गो-संगोपन असे पारंपरिक भारतीय जीवनशैलीचे विविध पैलू आहेत. या सर्वांची ओळख आपल्याला आहेच, ती मुलांनाही व्हावी या उद्देशाने ‘विद्याभारती’ चार दिवसांचे निवासी शिबिर आयोजित करीत आहे, त्यात सहभागी होणाऱ्यांना पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येईल आणि मंद संगीताच्या साथीने झोप लागेल. शिबिराचा लाभ मुलांना अष्टपैलू आणि सुजाण नागरिक बनवण्यासाठी नक्कीच होणार आहे. वय वर्षे १० ते १६ या वयोगटातील मुलेमुली या शिबिरात सहभागी होऊ शकतील.
हे शिबिर ४ ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिरळ (ता. चिपळूण) येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुलात होणार आहे. अधिक माहितीसाठी – डॉ. अश्विनी गणपत्ये (9527297400) किंवा प्रसाद सनगरे (9422054962) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

