रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी ई- इन्व्हॉइस व जीएसटी आर ९ आणि ९ सी यावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. थिबा पॅलेस रोड येथील मथुरा हॉटेलच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सीए चैतन्य वैद्य यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.
जीएसटी कायद्यातील तरतुदीनुसार विशिष्ट व्यापाऱ्यांना वार्षिक रिटर्न फॉर्म नं. ९ व ९ सी या स्वरूपात सादर करावे लागतात. या विवरणपत्रांची माहिती, त्यासोबत द्यावयाची आकडेमोड, इनपुट टॅक्स क्रेडिट संदर्भातील तरतुदी यावर सीए वैद्य यांनी सखोल विवेचन केले. तसेच डिजिटलायझेशन व ई-गव्हर्नन्सच्या दिशेने जीएसटी ई-इन्व्हॉइस हे सरकारचे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर ऊहापोह त्यांनी केला. ई-इन्व्हॉइसच्या संकल्पनेतून करचुकवेगिरी आणि बनावट टॅक्स क्रेडिट यासारख्या गोष्टींनाही आळा बसेल, असे सीए चैतन्य वैद्य यांनी स्पष्ट केले.
यावेळी सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर यांनी सीए चैतन्य वैद्य यांचा सत्कार केला. विकासा चेअरमन सीए अभिलाषा मुळ्ये, खजिनदार सीए केदार करंबेळकर, सचिव सीए अक्षय जोशी, कमिटी सदस्य शैलेश हळबे तसेच सीएंच्या कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेवटी विचारलेल्या शंकांचे समाधान सीए वैद्य यांनी केले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

