प्रा. मधू दंडवते यांची रविवारी मुंबईत जन्मशताब्दी

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी मुंबईत रविवारी (दि. १४ जानेवारी) अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे साजरी करण्यात येणार आहे.

समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीची सभा पार पडेल.
जन्मशताब्दी सोहळा २३ सहयोगी संस्थांच्या सहकार्याने पार पडणार आहे. त्यामध्ये कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ-ठाणे, वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, वसई-विरार, कोकण रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई, अखिल कोकण विकास महासंघ, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण-सावंतवाडी, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघटना, लालबाग-परळ, कोकण रेल्वे जागृत प्रवासी संघ-बोरिवली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-नवी मुंबई, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्था-डहाणू, आमची पश्चिम रेल्वे-मुंबई, निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप, जल फाउंडेशन-खेड, सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, कुणबी युवामंच-मुंबई माणगाव, विलवडे रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई / ग्रामीण, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती-चिपळूण, आम्ही वसई-विरारकर, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे अंजनी पंचक्रोशी संघर्ष समिती, मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, आम्ही पालघरकर, आवाहन फॉर परिवर्तन संस्था-नवीन पनवेल, बोरिवली-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना-बोरिवली आणि ऑल जर्नालिस्ट-रत्नागिरी या संस्थांचा समावेश आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजन विचारे, राहुल शेवाळे, मनोज कोटक, अरविंद सावंत, राजेंद्र गावीत, आमदार बाळा नांदगावकर, माजी खासदार नीलेश राणे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम मुंबईत परळ येथे सेंट्रल रेल्वे वर्कशॉपसमोर परमार गुरूजी मार्गावरील महाजनवाडी भावसार सभागृहात सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. कोकणवासीयांनी जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव यशवंत जड्यार, प्रमुख राजू सु. कांबळे, सेक्रेटरी दर्शन पां. कासले यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply