कोकणातील महास्वच्छता अभियानाचा गणपतीपुळ्यात प्रारंभ

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील मंदिर परिसराची स्वच्छता करून कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कोकण विभागातील मंदिर महास्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी आज गणपतीपुळे येथील श्री क्षेत्र गणपती मंदिर परिसराची स्वच्छता केली. आज मकर संक्रातीच्या मुहूर्तावर हा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, गणपती मंदिर संस्थानचे सरपंच प्रा. विनायक राऊत, स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा त्यात सहभाग होता.

सकाळी गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याची प्रथम स्वच्छता करण्यात आली. बचत गटाच्या महिला, आपदा मित्र, स्वामी बाळ सत्यधारी महाराज अध्यात्म केंद्राचे अनुयायी, गणपतीपुळे ग्रामस्थ, उपसरपंच संजय माने, ग्रामपंचायत सदस्य, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, राहूल पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, पोलीस दलाचे कर्मचारी, जेएसडब्ल्यूचे अधिकारी-कर्मचारी यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

यानंतर गणपती मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून डॉ. कल्याणकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कालच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन मंदिर परिसर स्वच्छता करण्याबाबत आवाहन केले होते. जवळजवळ सात जिल्ह्यांतील प्रतिनिधी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरीत जमा झाले होते. त्या सर्वांना सोबत घेऊन महास्वच्छता अभियांनार्तगत डीप क्लीनिंग ड्राइव्ह गणपतीपुळे येथून सुरू केले असून, जिल्ह्यात सर्वत्र राबविली जाईल

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत गणपतीपुळे मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ आज मकर संक्रांतीदिनानिमित्त करण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply