चार मिनिटांच्या भाषणात दोन लाखाचे पहिले बक्षीस देणारी स्पर्धा

रत्नागिरी : चार मिनिटांच्या भाषणानंतर दोन लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळू शकणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाकरिता तरुणांनी येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेहरू युवा केंद्र ही भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणारी संस्था असून संस्थेतर्फे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धकाला हिंदी, इंग्रजी किंवा मराठी भाषेत विषय मांडावा लागणार आहे. स्पर्धेचा वेळ जास्तीत जास्त ४ मिनिटे असेल. स्पर्धकांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे (१ फेब्रुवारी २०२४) पर्यंत असावी. जिल्हास्तरीय स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने, राज्यस्तरीय स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने, तर राष्ट्रीय स्तरावर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे दोन लाख रुपये, १ लाख ५० हजार आणि एक लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांक विजेता स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या तीन विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांसाठी संसदेत आमंत्रित केले जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी mybharat.gov.in या पोर्टलवर १६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी. पोर्टल नोंदणी करण्यासाठी अडचणी येत असल्यास १६ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी qnykratnagiri@gmail.com या ईमेलवर नोंदणी अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र 719, ई-विंग बिल्डिंगसमोर, संकेश्वरनगर, गांधी कम्पाउंड, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा तसेच तेथे विहित अर्जामध्ये अर्ज सादर करता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी qnykratnagiri@gmail.com वर ईमेलवर लिहा किंवा (02352) 295804, 9176093429 या क्रमांकांवर संपर्क साधा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply