राम म्हणजे नेमके काय?
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
नमस्कार, जय श्रीराम!
अयोध्यानरेश दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी जन्मलेला पुत्र म्हणजेच भगवान विष्णूंचा सातवा अवतार प्रभू श्रीराम!
‘राम’ हा शब्द , ” तू ते म्हणजे ब्रह्म, आत्मा, परमात्मा आहेस” या महावाक्याचा द्योतक आहे. राम शब्दाने परब्रह्माचेच उद्बोधन होते. योगीजन ज्या अनंत, चिन्मय, नित्यानंदमय तत्त्वात दंग होऊन जातात, तोच राम होय! आपण राहत असलेल्या दृश्यमान जगाच्या अंतरंगात आपली आनंदशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांच्या जोरावर जे चैतन्य ‘रमण’ होऊन राहिले, त्यालाच संत महात्म्यांनी ‘राम’ या शब्दाने संबोधले. व्याकरणात ‘ रमू क्रीडायाम’ या धातूपासून राम शब्दाची निष्पत्ती झाली आहे. वैदिक वाङ्मयात त्यालाच परब्रह्म असे म्हणतात.
आपली सनातन भारतीय संस्कृती त्यागमय आहे. मनुष्य जीवनाचे प्रत्येक पाऊल गती तर आहेच पण यात्राही आहे. जीवनात आपल्या वाट्याला आलेले भोग ही त्यागाची एक पायरी आहे. यातूनच आत्मसमर्पणाची तयारी होते. कारण आजकालच्या गतिमान जीवनात समाजसन्मुख होऊन वाट्याला आलेले भोग भोगावयाचे, तर त्याच्या अधिकारातूनच कर्तव्य आणि कर्तव्याच्या पालनातूनच अधिकार प्राप्त होत असतो. दाशरथी रामांचे शुद्ध संस्कारातून विकसित झालेले जीवन हे कर्तव्याधिकारांचे मर्यादा पुरुषोत्तम तत्त्वच आहे आणि म्हणून ते भारताच्या इतिहासाचा आदर्श आहे. दैनंदिन व्यवहारात मनुष्याने कसे वागावे हे रामचरित्रातून आपल्याला समजते. माता, पिता, गुरू, आचार्य, स्नेही, शत्रू, सेवक, अंकित, प्रजाजन या सर्वांशी रामांची असलेली वागणूक ही प्रत्येक मनुष्यमात्राने आदर्श घ्यावा अशीच आहे. आणि म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी भारतीय समाजमनावर अधिराज्य गाजवले आहे…
अशा प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराचे पुनर्निर्माण आणि राम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सवाच्या निमित्ताने आज ‘राम’ या संकल्पनेबद्दल थोडीशी चर्चा केली. पुढच्या भागात ज्या ठिकाणी रामांचा जन्म झाला, ती अयोध्यानगरी वेद-पुराणातील नोंदीवरून समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू.
(संदर्भ – श्री. शंतनु परांजपे यांचे विवेचन)
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(संपर्क : ९४२२३७६३२७) - ……
प्रवेशिकांविषयी …
कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे
मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०
धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७
सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८
गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६
आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९
श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८
श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४
मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६
रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३
अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२
महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३
पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४
केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७
मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११
राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१
गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१
चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५
श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९
निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७
ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४
…….
याशिवाय समर्पण अॅपवरूनही प्रवेशिका उपलब्ध आहेत. समर्पण अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –
https://scan.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

