दापोलीत रविवारी सीए दिनानिमित्त सायकल फेरी

दापोली : चार्टर्ड अकाउंटेंट दिनाच्या निमित्ताने रविवारी, दि. ३० जून रोजी दापोलीत सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.

सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक विनामूल्य उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सीए दिनानिमित्ताने सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.

आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीए मान्यवरांच्या सन्मानार्थ रविवारी, ३० जून रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीदरम्यान दापोलीतील सीए मान्यवरांना भेटून त्यांना शुभेच्छा देण्यात येतील. चार्टर्ड अकाउंटेंट ऑडिटिंग, टॅक्सेशन, आर्थिक आणि सामान्य व्यवस्थापनासह व्यवसाय आणि वित्त या सर्व क्षेत्रात ते काम करतात. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली सीएची परीक्षा, आर्थिक क्षेत्रातील विविध धोरण, सुविधा, जीएसटी, वस्तू व सेवा कर इत्यादींबद्दल माहिती या सायकल फेरीदरम्यान जाणून घेण्यात येईल.

ही सायकल फेरी दापोलीच्या आझाद मैदानातून सकाळी साडेसात वाजता सुरु होईल. ती केळस्कर नाका, बुरोंडी नाका, लाल कट्टा, नर्सरी रोड, आझाद मैदान अशी ५ किमीची असेल. सायकल फेरीचा समारोप आझाद मैदानात सकाळी साडेनऊ वाजता होईल. या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ९०२८७४१५९५ किंवा ८७६७२८५८२७ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.. सर्वांनी या फेरीत सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply