रत्नागिरी : रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज, दि. २७ जानेवारी दुसरे देहदान झाले. रत्नागिरी आकाशवाणीचे माजी निवेदक मिरजोळे हनुमाननगर येथे राहणारे सुरेश सीताराम भावे (वय ७९) यांचे हे देहदान होते.
भावे यांचे काल रात्री पुण्यात निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच करायचा संकल्प केला होता. रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे तो पूर्ण झाला. त्यांची कन्या सौ. दर्शना बापट आणि जावई मोहन बापट तसेच भावे यांचे मित्र नेत्रदान, देहदान चळवळीचे कार्यकर्ते समाजसेवक समीर करमरकर, विनायक शितूत यांच्या पुढाकाराने भावे यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज करण्यात आले.
देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजूषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिले. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

