नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा

नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा

पुणे : येथील नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे निःशुल्क सत्ताविसावी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आतापर्यंत काव्यमंचातर्फे ८ अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलने, १७० प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्यमैफली, शेकडो काव्यबैठका, कार्यशाळा, काव्यसहलींचे आयोजन केले आहे. काव्यमंचच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहेत. सत्ताविसावी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच श्रावण व निसर्ग या विषयांवर कवींनी दोन कविता पाठवाव्या. स्पर्धेतून निवडलेल्या कवितांना व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प, श्रीफळ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात येईल.

कवींनी आपल्या कविता १६ सप्टेंबर २०२६पर्यंत पोस्टाने पाठवाव्या. कवींनी आपला पिनकोडसह पत्ता, मोबाइल कळवावा. कविता पाठविण्यासाठी पत्ता – प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे, अध्यक्ष, नक्षत्राचं देणं काव्यमंच, साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाईटस्, पी. सी. एम. टी. चौक, भोसरी, पुणे-३९. संपर्क क्र. – ९६५७३४८६२२

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply