वालावल : डॉ. अशोक प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या स्वरसिंधुरत्न शास्त्रीय गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कारांचे विशेष सोहळ्यात वितरण करण्यात आले. वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर (२९ जून २०२३) या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
