मधुमेहामुळे मेंदूपासून पायांपर्यंत सर्व अवयवांवर होतात दुष्परिणाम!

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा दुसरा भाग…

पाय तपासा, पाय वाचवा : मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांचा मधुमेहींना मंत्र

‘मधुमेहामुळे जगभरात सध्या दर अर्ध्या मिनिटाला एका व्यक्तीचा पाय कापावा लागतो. योग्य वेळी तपासणी न केल्यामुळे आणि उपचार न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे; मात्र मधुमेही व्यक्तींनी शरीरातील अन्य महत्त्वाच्या अवयवांबरोबरच पायांच्या आरोग्याबद्दलही दक्ष राहून नियमित तपासणी करून वेळीच उपचार घेतल्यास यातील ८० टक्के जणांचे पाय वाचवणे शक्य आहे,’ असे प्रतिपादन ठाण्यातील प्रथितयश मधुमेहतज्ज्ञ (डायबेटॉलॉजिस्ट) डॉ. आशिष सरवटे यांनी केले.

मधुमेहाच्या राजधानीत… जाणून घेऊ या मधुमेहाविषयी…!

आज १४ नोव्हेंबर अर्थात जागतिक मधुमेह दिन. मधुमेह अर्थात डायबेटीस हा शब्द माहिती नाही, अशी व्यक्ती आजच्या घडीला सापडणार नाही. कारण मधुमेहाने सारे जगच व्यापून टाकले आहे आणि भारताला तर ‘मधुमेहाची राजधानी’ असा नकोसा किताब मिळालेला आहे. म्हणूनच मधुमेहाविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनशैलीशी निगडित असलेल्या या समस्येशी दोन हात करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मधुमेह दिनाचे औचित्य साधून त्या विषयावर ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांनी लिहिलेल्या लेखमालेचा हा पहिला भाग…

तुम्हाला मधुमेह आहे? ठाण्यातील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञांचे रत्नागिरीत व्याख्यान

जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबर रोजी पाळला जातो. त्याचे औचित्य साधून १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरीत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

लहान मुलांसाठीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचमध्ये विषारी पदार्थ; वापर तात्काळ थांबवण्याचे आवाहन

कोल्ड्रिफ कफ सिरपच्या बॅच नं. SR-13मध्ये विषारी पदार्थ आढळल्यामुळे त्याचा वापर नागरिकांनी तात्काळ थांबवावा. हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या जवळच्या कार्यालयाला त्वरित कळवावे किंवा acfdartn2019@gmail.com यावर ई-मेलकरून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) शशिकांत यादव यांनी केले आहे.

१० मार्चपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात उष्मालाट उद्भवण्याची शक्यता

रत्नागिरी : कुलाबा (मुंबई) येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामानविषयक पूर्वसूचनेनुसार १० मार्चपर्यंत जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता आहे.