राजापूर : राजापूर शहरातून अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा शहराला पडलेला वेढा काहीसा सैल झाला असला, तरी अद्यापही पूरस्थिती कायम आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : राजापूर शहरातून अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा शहराला पडलेला वेढा काहीसा सैल झाला असला, तरी अद्यापही पूरस्थिती कायम आहे.
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी (दि. २० जुलै) जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या स्थितीनुसार, खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे.
चिपळूण : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार वृष्टी सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या स्थितीनुसार, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातील नाईक कंपनी/मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूट पाणी भरलेले आहे.
चिपळूण : तिवरे (ता. चिपळूण) गावात दीडशे वृक्षरोपांच्या लागवडीचे अभियान तरुणाईच्या पुढाकाराने यशस्वी झाले. लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांनी कोकणातील निसर्ग आणि त्यांच्या कोकणातील वास्तव्याच्या काळातील पर्यावरणाच्या आठवणी जागवल्या.