रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना गुरुवारी सुट्टी

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी (दि. २० जुलै) जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. तसा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या म्हणजेच सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेले अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २१ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याला सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस सुरू असून खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी हवामान खात्याचा राज्यात अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply