स्पर्धा परीक्षांविषयी रत्नागिरीत शनिवारी मोफत सेमिनार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या शनिवारी (दि. २२ जुलै) रोजी सकाळी १० वाजता मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये हे सेमिनार होणार आहे. या सेमिनारसाठी मार्गदर्शक म्हणून रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड आणि रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर मार्गदर्शन करणार आहेत.

कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी बनावेत, याकरिता अकादमीतर्फे दरवर्षी एमपीएससी, राज्यसेवा, यूपीएससी, एमपीएससी फाऊंडेशन, बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन, पोलीस भरती, आरोग्यसेवक भरती, तलाठी भरती, सेट नेट परीक्षा आणि तत्सम इतर स्पर्धा परीक्षांचे कोर्सेस घेतले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून दृष्टिकोनातून शनिवारी मोफत सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पालकांनी मोफत सेमिनारचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply