रत्नागिरीतील माता रमाई बचत गटाने साजरा केला रौप्यमहोत्सव

महिला बचत गटांची चळवळ आज खूप फोफावली आहे; मात्र ही संकल्पना नवीनच असताना रत्नागिरीत सुरू झालेल्या माता रमाई बचत गटाने नुकतीच रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केली आहे.

त्रिंबक वाचनालयातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने दादा ठाकूर (आचरे- पारवाडी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या (प्रौढ गट) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक : स्वतःपुरते जगू नका

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इंदूर येथील नाट्य भारती संस्थेने काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक हे नाटक सादर केले. स्वतःपुरते जगू नका. तुमच्या जगण्याचा इतरांनाही उपयोग करून द्या, असा संदेश नाटकाने दिला आहे.

अऽय : सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय सांगणारे नाटक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अहिल्यानगर येथील नाट्यमल्हार प्रतिष्ठान संस्थेने अऽय हे बलात्काराच्या सामाजिक समस्येवरील नाटक सादर केले.

कुडाळजवळ वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकली; कोकण रेल्वेची वाहतूक साडेतीन तास ठप्प

वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकून झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक साडेतीन तासांनी सुरळीत झाली.

द ब्लॅंक्ड इक्वेशन : अमेरिका-जपान युद्धाचा विषय

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अहिल्यानगर येथील नाट्य आराधना संस्थेने द ब्लॅंक्ड इक्वेशन हे अमेरिका-जपान युद्धावर आधारित नाटक सादर केले.