पळून चाललंय गाव, आचरे त्याचं नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे इथली गावपळण १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २०१९ सालानंतर यंदाचं वर्ष गावपळणीचं असल्याने प्रथेनुसार देवदिवाळीला श्री देव रामेश्वराचा कौल घेण्यात आला. त्यानंतर हे दिवस निश्चित झाले. गावातली सगळी मंडळी या काळात बाहेर जातात. आजच्या काळातही पाळल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेबद्दल आचरे गावातले ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख इथे प्रसिद्ध करत आहोत.

‘मराठीचा नुसता अभिमान नको; चांगले भाषाव्यवहार गरजेचे’

रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या नवव्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावर अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्याचा समारंभ नुकताच लांज्यातील लोकमान्य वाचनालयात पार पडला.

कोकण मीडिया लेख आणि चित्रकला स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण

रत्नागिरी : रत्नागिरीतील कोकण मीडियातर्फे दिवाळी अंकासाठी कोकणातील ग्रामदैवते या विषयावरील लेख आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण लांजा येथे येत्या रविवारी (दि. १ डिसेंबर) होणार आहे.

मोडीदर्पण, कोकण मीडिया दिवाळी अंकांचे प्रकाशन

मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसारार्थ असलेला मराठी वाचकांनाही खुमासदार मेजवानी देणारा मोडीदर्पण दिवाळी अंक आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया दिवाळी अंक या दोन्ही अंकांचे संयुक्त प्रकाशन पवई हायस्कूलमध्ये दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.

भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवायला पाहिजे : कौशल इनामदार

रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजते. याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे. शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो, पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.

कोकणातील ग्रामदैवते – लेख आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर; कोकण मीडिया दिवाळी अंक लवकरच भेटीला

साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विजेत्यांचे लेख आणि चित्रांसह ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या अन्य निवडक लेखांचा समावेश असलेला साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दर्जेदार दिवाळी अंक लवकरच प्रसिद्ध होत आहे.