कवितेचा ‘फुल बॅलन्स’ असलेले आ. सो. शेवरे (सिंधुसाहित्यसरिता – १)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा पहिला लेख… कवी आ. सो. शेवरे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे कल्पना मलये यांनी…

सिंधुदुर्गातील साहित्यिकांचा परिचय करून देणार ‘कोमसाप-मालवण’चा ‘सिंधुसाहित्यसरिता’ उपक्रम

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने आयोजित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ ह्या लेखमालेचे उद्घाटन मधुसूदन नानिवडेकर यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात झाले.

तुम्ही सर्जनशील आहात? मग ही अपुरी कथा पूर्ण करा आणि बक्षिसे मिळवा…

दोडामार्ग : येथील दोडामार्ग एक्स्प्रेस काव्यमंचाने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खुली कथापूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात

नेम श्रावणमासाचा – राघवयादवीयम् – अद्भुत श्लोकसंग्रहाचा परिचय

आज, २१ जुलै २०२० रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महिनाभर संस्कृत साहित्यातील एका अद्भुत श्लोकसंग्रहाचा परिचय करून देणारी मालिका ‘कोकण मीडिया’वर प्रसिद्ध केली जाणार आहे. राघवयादवीयम् हे त्या श्लोकसंग्रहाचे नाव.

मालवणमध्ये ऑनलाइन विज्ञानकथा पंधरवड्याची सुरुवात

मालवण : मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कथामाला, सेवांगण आणि कोमसाप या ग्रुपवर ऑनलाइन विज्ञानकथा पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला. बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाची कथा प्रभावी कथनशैलीत सादर करून या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत सिंधुदुर्गाबरोबरच राज्यभरातील मुलांसाठी दररोज एक विज्ञानकथा सादर केली जाणार आहे.

कलमठमधील ‘नाडकर्ण्यांच्या वाड्या’चे वैभव अनुभवा ई-बुकमधून…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील कलमठ गावात ४० खोल्यांचा, दुमजली, चौसोपी, अवाढव्य असा नाडकर्ण्यांचा वाडा होता. भावी पिढीला नाडकर्ण्यांचे हे वैभव कळावे, त्यांना वाडा अनुभवता यावा म्हणून सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर यांनी ‘नाडकर्ण्यांचा वाडा’ हे छोटे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी आणि त्याचे ई-बुक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.