कोकणात अनेक कारणांमुळे भात या मुख्य पिकाच्या लागवडीमध्येच घट झाल्यामुळे नाचणीची लागवडही थांबली आहे. या पिकांचे खाद्यपदार्थांमधील महत्त्व पटवून देत असताना या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा वाढावा यासाठी प्रामुख्याने प्रयत्न व्हायला हवेत. स्थानिक गरजा आणि समस्या लक्षात घेऊन त्यासाठी कोकणाकरिता स्वतंत्र धोरण आखावे लागेल. तशी धोरणे वर्षभरात ठरविली गेली, तरी भरडधान्य वर्ष साजरे केल्यासारखे होईल.
